Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा

 ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा

मुंबई : ऐतिहासिक सीएसएमटी स्थानक आता हरित स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. जागतिक वारसा असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सीएसएमटी स्थानक हरित ऊर्जेने प्रकाशमान होणार आहे. हरित ऊर्जेमुळे सीएसएमटी स्थानक वर्षाला दीड कोटी रुपयांची वीजेची बचत करणार आहे.

केंद्र सरकराच्या हरित उर्जा कंपनीसोबत मध्य रेल्वेने करार केला आहे. या करारातंर्गत पवन उर्जेद्वारे सीएसएमटी स्थानक प्रकाशमान होणार आहे. सांगली येथील पवन ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी वीज मध्य रेल्वेच्या स्थानकांत वापरली जाणार आहे. यात  मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह, मनमाड, भुसावळ आणि नागपूर स्थानकांचा समावेश आहे.

 पवन ऊर्जा प्रकल्पातून एकूण १२.९३ लाख युनिट वीज तयार होणार आहे. सीएसएमटी स्थानकातील विविध कार्यालये, प्रतिक्षालय, विविध विभागांच्या कार्यालये लवकरच पवन ऊर्जेने प्रकाशमान होणार आहे. करारानूसार आगामी २५ वर्षांपर्यंत पवन ऊर्जेद्वारे सीएसएमटी स्थानकात लखलखाट होणार आहे. या करारानूसार सीएसएमटी स्थानक वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत होणार आहे.

Read More