Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'अचानकपणे कबुतरखाना बंद करणे अयोग्य', जैन समाजाकडून होणाऱ्या विरोधादरम्यान CM फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis on Kabutar Khana: मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरुन सध्या चर्चा रंगली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.   

'अचानकपणे कबुतरखाना बंद करणे अयोग्य', जैन समाजाकडून होणाऱ्या विरोधादरम्यान CM फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis on Kabutar Khana: मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरुन सध्या चर्चा रंगली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्याने जैन समाजातील नागरिकांनी विरोध केला असून, हवं तर त्यासाठी आमच्यावर कर लावा अशा शब्दांत त्यांनी मुंबईत निषेध केला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखाना प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शासनाची तयारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीच्या बैठकीनंतर मुंबईतील कबूतरखान्याबाबत बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बैठक; अजित पवार, गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते. जैन समाजाने मुंबईतील कबूतरखाना काढण्यास विरोध केला आहे. दरम्यान हत्तीणपाठोपाठ कबुतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. 

"कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. कोणत्या वेळेत फिडिंग व्हावे आणि कोणत्या वेळेत नाही, असा नियम तयार करता येईल. आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा. कबुतराची विष्ठा साफ करण्याचे तंत्र आहे, त्याचाही विचार करा. यासंदर्भात माझी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावे," अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असंही त्यांनी सांगितलं आहे. 


महादेवी हत्तीणीसाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार

34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात असून, हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसे सुप्रीम कोर्टात सांगेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्र्वस्त्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

FAQ

1) कबूतरखाना का वादग्रस्त आहे?

कबूतरखान्यांमुळे कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार (जसे की हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस), दमा, आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो. यामुळे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या, आणि मुंबई उच्च न्यायालयाने कबूतर खान्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. तसेच, जैन समाजाने याला धार्मिक विश्वासांवर हल्ला मानत विरोध केला आहे.

2) जैन समाजाचा कबूतरखाना बंदीला का विरोध आहे?

जैन समाज कबुतरांना खाद्य देणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे धार्मिक कर्तव्य मानतो. त्यामुळे कबूतर खाना बंदीला त्यांनी धार्मिक विश्वासांवर हल्ला मानलं. ऑगस्ट 2025 मध्ये, जैन समाजाने दादर येथे ‘शांतिदूत यात्रा’ काढून BMC च्या कारवाईविरुद्ध निषेध व्यक्त केला आणि हजारो कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा केला

Read More