Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

... म्हणून लागला माझ्या करिअरला ब्रेक - चित्रांगदा सिंग

'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने आपल्या अपयशाचं कारण सांगितलंय. 

... म्हणून लागला माझ्या करिअरला ब्रेक - चित्रांगदा सिंग

मुंबई : 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने आपल्या अपयशाचं कारण सांगितलंय. 

चित्रांगदाच्या म्हणण्यानुसार, करिअरमध्ये 'ब्रेक' घेतल्यामुळे तिच्या करिअरलाच ब्रेक लागलाय. चित्रांगदानं आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांवर छाप सोडली होती. परंतु, ती फारशी पुढे जाऊ शकली नाही.

मी करिअरला सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात अशी वळणँ आली जिथं माझ्या आयुष्याची प्राथमिकता बदलत गेल्या. मी सिनेमात पाऊल टाकलं आणि त्यानंतर तब्बल चार वर्षांचा ब्रेक घेतला... त्यानंतर मी पुन्हा एकदा सिनेमात आले आणि पुन्हा दोन वर्षांचा ब्रेक घेतला... सिनेसृष्टीत जेव्हा तुम्हाला संधी मिळत आहे पण तुम्ही त्या घेत नाहीत तेव्हा निश्चित रुपात त्याचा परिणाम करिअरवर पडतो... माझ्यासोबतही तेच घडलं, असं चित्रांगदानं म्हटलंय.  

fallbacks

चित्रांगदा गोल्फ खेळाडून ज्योति रंधावाशी विवाह केला होता... त्यानंतर मात्र काही वर्षांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

चित्रांगदानं देसी बॉयज, ये साली जिंदगी आणि गब्बर इज बॅकमध्ये काम केलंय. 

Read More