Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आता हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, लवकरच सिडकोची भव्य लॉटरी

सिडको आणखी नवीन घराची लॉटरी  काढणार, पाहा कोणत्या भागांमध्ये किती घरांसाठी लॉटरी निघणार आणि याची घोषणा कधी होणार

आता हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, लवकरच सिडकोची भव्य लॉटरी

स्वाती नाईक, झी 24 तास, मुंबई : आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र हे पूर्ण करण्यासाठी आयुष्यातली काही वर्ष उलटली तरी कधीकधी पूर्ण होत नाहीत. आता हेच स्वप्न सिडको पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई  सारख्या शहरांत घरांच्या अव्वाच्या सव्वा किमती पाहता सर्वसामान्यांना घरे खरेदी करण्यात अडचणी येतात. सिडकोकडून सवलतीच्या दरात नागरिकांना सिडको आणि म्हाडा घरं उपलब्ध करुन देतं. 

सिडकोने पुन्हा एकदा हक्काचं घर असावं हे नागरिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लॉटरी आणली आहे. या लॉटरीची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे. सिडकोकडून पुन्हा नव्याने घरांची लॉटरी एप्रिलमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे असणार आहे ही घरे सानपाडा,  जुईनगर, मानसरोवर ,उलवा या रेल्वे  स्टेशन परिसरात  असणार आहेत. यामध्ये जुईनगरमध्ये -1800, सानपाडा भागात - 1200, ट्रक टर्मिनल येथे 1200, मानसरोवर  इथे1800 आणि उलवा येथे बांधण्याचे काम सुरू आहे.

यातील किती घरे सिडको लॉटरीसाठी काढतील याचे प्लानिग सुरू आहे.  नुकतीच तळोजा इथल्या पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्याला एका आढवड्यात दहा हजार अर्ज आले होते. त्यामुळे  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडको घरे किती घरे काढेल याकडे सर्वांचे लक्ष लागून  राहिले आहे. 

Read More