Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कोविड काळात उद्धवजींचे चांगले काम, मी शिवसैनिकच राहीन - उर्मिला मातोंडकर

काँग्रेस (Congress) पक्षाचा मी राजीनामा दिला होता. मात्र, मी राजकारण सोडलेले नव्हते. जमिनीवरून उतरून काम करायचे आहे. मी शिवसैनिकच (Shiv Sainik) राहीन, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या म्हणाल्या.

कोविड काळात उद्धवजींचे चांगले काम, मी शिवसैनिकच राहीन - उर्मिला मातोंडकर

मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षाचा मी राजीनामा दिला होता. मात्र, मी राजकारण सोडलेले नव्हते. जमिनीवरून उतरून काम करायचे आहे. मी शिवसैनिकच (Shiv Sainik) राहीन. शिवसेनेने (Shiv Sena) हिंदुत्व सोडलेले नाही. सेक्यूलर म्हणजे इतर धर्मांना विरोध नव्हे. हिंदू धर्माचा चांगला अभ्यास माझा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा पक्ष प्रवेश करावा, याकरिता फोन आला होता. तसेच काँग्रेस सोडली असली तरी कधी काँग्रेसवर टीका केली नाही. सगळ्यांशी माझे मत चांगले आहे. आज कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले आहे, असे शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. मी शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. मी कोणावर टीका करणार नाही. मी चांगले काम करण्याला प्राधान्य देणार आहे. मला अनेक जण ट्रोल करत आहेत. त्यांचे त्यांनी काम करावे, मी माझे काम करत राहणार मी कोणावर टीका करणार आहे. तसेच कंगना रानौत हिचा विषय संपला आहे. त्यावर बोलणे उचित नाही.  

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा वाढावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले. त्यानंतर मी माझा होकार कळविला. माझे नाव विधान परिषदेसाठी सूचवले गेले आहे. बघुया आता कधी, नावावर शिक्कामोर्तब होते ते? असे म्हणत शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.  

मी मराठी मुलगी आहे. साध्या मराठी घराण्यातून बॉलीवूडमध्ये आली होती. लोकांनी बनवलेली स्टार होती, लोकांनी बनवलेली लीडर होईन. राजकीय वाटचालीसाठी एक पाऊल उचललं आहे.  महाविकास आघाडीने चांगले काम केलं आहे. खूप कठिण काळात हे काम केले आहे.  मी शिवसैनिकच राहीन, असे त्या म्हणाल्या. तेव्हाही टीका केली नव्हती, ओघात उत्तर दिले. ट्रोलला वेलकम करत आहे. जे मी करत आहे, ते बरोबर हे समजते. ट्रोल हिन पातळीची राहिली आहे. ती त्यांची रणनिती आहे. सवंग आरोप करुन मला प्रसिद्धी मिळवायची नाही. कारण तो अत्यंत सोपा मार्ग असतो. काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी पदाची अपेक्षा केली नव्हती. आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी शिवसेनेत आले आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.

मी मराठी आहे, पाऊल पुढं टाकत आहे. मुलींच्या सेफ्टीवर काम करायला आवडेल, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. तसेच कंगनाला उत्तर नाही देणार, असे सांगत योगी आदित्यनाथ यांचे स्वागत आहे, असे त्या म्हणाल्या.

Read More