Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, काँग्रेस आमदाराची मुंबई काँग्रेस अध्यक्षांविरोधात दिल्लीत तक्रार

सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे तक्रार 

मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, काँग्रेस आमदाराची मुंबई काँग्रेस अध्यक्षांविरोधात दिल्लीत तक्रार

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्यकी यांनी पत्र लिहून तक्रार केली आहे. (Controversy erupts in Mumbai Congress, Congress MLA  complaint against Mumbai Congress President in Delhi) माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्यकी यांनी भाई जगताप यांच्या विरोधात पत्रात केला आहे.

झिशान सिद्यका यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कार्यक्रम घेतला, मात्र स्थानिक आमदार असून त्यांना बोलवलं नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत झिशान सिद्यकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असं नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस स्थानकात मुंबई काँग्रेसने पोलिसांना कोरोनासाठी आवश्यक साधन सामुग्री वाटप केले. त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. पण स्थानिक आमदार असून झिशान सिद्यकी याना बोलवण्यात आले नाही, प्रोटोकॉल पाळले जात नाहीत अशीही पत्रात तक्रार केली आहे. 

पक्षात माझ्या विरुद्ध काम करणार्‍यांना ताकद दिली जाते अशी तक्रार झिशान सिद्यकी याने पत्रात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लिहिलेलं पत्र झिशान याने महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, के सी वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांना देखील पाठवले आहे

Read More