Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

एकंदरीत कोरोना होण्यापेक्षा कोरोनाचे उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची दहशतच लोकांमध्ये जास्त दिसून येत आहे.

राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रीत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर काळजी घेतली जात नसल्याने ग्रामीण तसेच निमशहरी भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. काही तालुक्यांमध्ये दिवसाला सरासरी १० ते ६० असे कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात उघडल्यानंतर ग्रामीण भागातील व्यवहार सामान्य झाल्यासारखं वातावरण आहे. पण काळजी घेतली जात नसल्याने उतार वयातील लोकांना कोरोनाची अधिक लागण होत आहे.

सुरूवातीला दिसणाऱ्या लक्षणांकडे दूर्लक्ष होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर सरासरी हात धुण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडेही लक्ष दिलं जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र सार्वजनिक वाहतुकीला ग्रामीण भागात अजूनही वेग आलेला नाही. कारण एसटी सुरू होवूनही प्रवासी वाहनांकडे फिरकत नसल्याचं चित्र आहे.

ग्रामीण आणि निमशहरी भागाला लागून असलेली खासगी रूग्णालयं देखील अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याचं रूग्ण सांगतात. काही रूग्णांचं ७ दिवसांचं बिल हे १ लाख ते ५० हजाराच्या आत आकारले जात आहे.

एकंदरीत कोरोना होण्यापेक्षा कोरोनाचे उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची दहशतच लोकांमध्ये जास्त दिसून येत आहे.

Read More