Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राज्यात लागोपाठ २ दिवस कोरोनाचे ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले, २५८ मृत्यू

राज्यामध्ये सलग दोन दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ८ हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे.

राज्यात लागोपाठ २ दिवस कोरोनाचे ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले, २५८ मृत्यू

मुंबई : राज्यामध्ये सलग दोन दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ८ हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे. मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ८,३०८ रुग्ण वाढले आहेत, तर २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजही मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले आहेत. मुंबईत आजच्या दिवसात १,२९४ तर पुण्यात १,५३९ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात ६२ जणांचा मृत्यू झाला, तर पुणे मनपा क्षेत्रात २१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. 

दरम्यान राज्यात काल आत्तापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. काल महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल ८६४१ नवे रुग्ण सापडले, तर २६६ जणांचा मृत्यू झाला होता. 

आजच्या एका दिवसात राज्यात २,२१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत कोरोनाचे १,६०,३५७ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या २,९२,५८९ एवढी आहे. यातले १,२०,४८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यामध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत ११,४५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातलं कोरोनामुळे मृत्यू व्हायचं प्रमाण ३.९१ टक्के एवढं आहे. तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर १९.७ टक्के आहे.

Read More