Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबरमध्ये परीक्षा होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या एटीकेटीच्या परीक्षांचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याआधीच बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. तर कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर होऊ शकला नाही. कोरोना नियंत्रणात येत नसल्यामुळे अखेर दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना भुगोलाचे सरासरी मार्क देण्यात आले.

Read More