Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मलायका अरोराविरोधात वॉरंट जारी; सैफ अली खान प्रकरणात 'ती' एक चूक भोवली

Malaika Arora Warrant: या प्रकरणामध्ये नुकताच एका अभिनेत्रीने जबाब नोंदवला असून मागील 13 वर्षांपासून सदर प्रकरणामध्ये सुनावणी सुरु आहे. नक्की घडलेलं काय जाणून घेऊयात...

मलायका अरोराविरोधात वॉरंट जारी; सैफ अली खान प्रकरणात 'ती' एक चूक भोवली

Malaika Arora Warrant: अभिनेता सैफ अली खानसंदर्भातील एका प्रकरणामुळे सैफची पत्नी करिना कपूरची जीवलग मैत्रीण असलेली अभिनेत्री मलायका अरोरा  अडचणीत आली आहे. मुंबईमधील न्यायालयाने मलायकाविरोधात वॉरंट जारी केलं आहे. मुंबईमधील एका बड्या हॉटेलमध्ये 2012 साली झालेल्या एका मारहाण प्रकरणामध्ये सैफ अली खानवर आरोप असून आता या प्रकरणात मलायका तिच्याच एका चुकीमुळे अडकली आहे. सदर प्रकरणामध्ये नेमकं घडलेलं काय आणि मलायकाने काय चूक केलीय जाणून घेऊयात...

हे प्रकरण काय?

2012 साली सैफ अली खानने मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एका एनआरआय उद्योजकांबरोबरच त्याच्या वडिलांवर हल्ला केल्याचं हे प्रकरण आहे. हॉटेलमधील हाणामारीचा सारा घटनाक्रम 22 फेब्रुवारी 2012 रोजी घडला होता. अभिनेता सैफ अली खान काही सहकाऱ्यांसोबत रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये गेला होता. या सहकाऱ्यांमध्ये सैफची विद्यमान पत्नी आणि तत्कालीन मैत्रीण करिना कपूरही होती. या प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता अरोरा-लाडकने आपला जबाब नोंदवताना संपूर्ण घटनाक्रम सांगितलेला.अमृताने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ग्रुपला हॉटेलने एक वेगळी जागा देण्यात आली होती. सर्वजण आनंदात मज्जा, मस्ती आणि गप्पा करत जेवणाचा आस्वाद घेत होते. अचानक या ठिकाणी तक्रारदार उद्योजक आला आणि त्याने आराडाओरड करण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

"आम्ही बसलेल्या ठिकाणी कोणीतरी तावातावात चालत आल्याचं आम्ही पाहिलं. फार मोठ्या आवाजात आणि आक्रमकपणे ही व्यक्ती आम्हाला शांत बसा आणि तसेच बसून राहा असं सांगत होती. नेमकं काय घडलंय हे आम्हाला कळलं नाही मात्र आम्हाला मोठा धक्का बसला," असं अमृताने सांगितलं. अचानक सैफ अली खान उभा राहिला आणि त्याने माफी मागितली, असंही अमृताने सांगितलं. त्यानंतर ही व्यक्ती निघून गेली आणि सैफबरोबर आलेल्या सहकऱ्यांनी पुन्हा जेवणास सुरुवात केली. त्यानंतर सैफ अली खान वॉशरुममध्ये गेला. अन् अचानक त्या वॉशरुममधून मोठ्याने आवाज येऊ लागले. त्यापैकी एक आवाज सैफ अली खानचा होता, असंही आमृताने कोर्टाला सांगितलं. त्यानंतर एक व्यक्ती सैफ अली खानला मारहाण करताना दिसली, असंही अमृता जबाब नोंदवताना म्हणाली. आमच्यासोबतच्या अनेकांनी मध्यस्थी करुन त्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं. त्यावेळी तो माणूस आम्हालाही शिव्या देऊ लागला. तो आम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असं म्हटल्याची माहिती अमृताने दिली.

नक्की वाचा >> 'मी कपडे बदलत असताना दाक्षिणात्य दिग्दर्शक माझ्या...'; अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव

ज्यावेळी हा सारा प्रकार घडला त्यावेळी सैफ अली खान हा अमृताबरोबरच करिना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा खान, अमृता राव आणि इतर काही मित्रांसोबत होता. ज्या उद्योजकाबरोबर सैफचा वाद झाला त्याचं नाव इक्बाल शर्मा असं होतं. सैफ आणि त्याच्या मित्रांनी माझे सासरे रमण पटेल यांना मारहाण केल्याचा आरोप इक्बाल शर्माने केला आहे.

मलायकाची काय चूक झाली?

याच प्रकरणामध्ये कोर्टाने 2012 मधील घटनेसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी मलायकाला साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेले. मात्र अनेकदा निर्देश देऊनही मलायका उपस्थित न राहिल्याने आता कोर्टाने तिच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याची चूक केल्यानेच मलायकाविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

या प्रकरणावर सैफचं म्हणणं काय?

या प्रकरणामध्ये सैफ अली खानने इक्बाल शर्मानेच आपल्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरत आरडाओरड करत अंगावर धावून आल्याने वाद झाल्याचा दावा कोर्टात बाजू मांडताना केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने इक्बाल शर्माला धमकी देत नाकावर बुक्की मारल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामध्ये सैफ आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More