Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Covid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले

Covid-19 Omicron BF.7 : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली तातडीची आढावा बैठक, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Covid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले

Corona Omicron BF.7 New Variant in India : भारतासाठी चिंता वाढणवारी बातमी. चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण (Covid 19 New Sub Variant) भारतात सापडलेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ही माहिती दिलीय. गुजरातमध्ये तीन तर ओडिशामध्ये 1 रुग्ण सापडलाय. गुजरातमधल्या बडोद्यामध्ये अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) असल्याचं निदान झालं. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची (Pfizer Vaccines) लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट (Home Isolate) करण्यात आलं होतं.

राज्य सरकार अलर्टमोडवर
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलंय. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग (Thermal Screening) वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी आढावा बैठकीनंतर दिली. चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण राज्यात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत बैठक होणार असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील पावलं उचलली जाणार असल्याचंही सावंत यांनी नमूद केलं. 

कोरोनाच्या सब व्हेरिएंटचं थैमान
चीनमध्ये सध्या कोरोनाचा BF.7 हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट (Omicron Sub Variant) थैमान घालतोय खोकला, ताप, थकवा, घशात खवखव अशी या व्हायरसची लक्षणं आहेत धक्कादायक बाब म्हणजे हा व्हेरियंट झपाट्यानं पसरतोय. पुढच्या काही दिवसांत तब्बल 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे तर 1 एप्रिल 2023 पर्यंत आणखी 1 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय.

केंद्र सरकार अॅक्शन मोडवर
दरम्यान केंद्र सरकारही अॅक्शन मोडवर आलंय. देशात मास्कसक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत. 

गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा 
ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश
न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा

आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना
केंद्राच्या ऍडव्हायजरीनुसार (Advisory) चीन, अमेरिका, जपान, ब्राझील, कोरियात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. त्यामुळे सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आलीय. जिनोम सिक्वेन्सिंगवर ( Genome Sequencing) लक्ष केंद्रित करा असंही सांगण्यात आलंय. तसच कोरोनाचा (Corona) प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही सूचना देण्यात आलीय. 

TAGS

coronaCOVID-19Corona VirusCoroan Virus in IndiaOmicron sub variantBF.7 found in indiaकोरोनाकोविड १९कोरोना बातम्यामराठी कोरोना बातम्याकोरोना बातम्या महाराष्ट्रकोरोना व्हायरस बातम्याकोरोना विषयी बातम्याकोरोना ताज्या बातम्याOmicron Sub Variant Patient Found in IndiaLatest Corona UpdatesCovid 19 Latest UpdatesCovid 19 GuidelinesCoronavirus Updatecoronavirus symptomscoronavirus update maharashtraCorona Cases In IndiaCorona cases in Mumbaicoronavirus newscovid news latestcoronavirus india active casescoronavirus india new variantmarathi newsmarathi news todaylatest marathi newsMarathi breaking newsMarathi Breaking News Todaymarathi news liveमराठी बातम्याताज्या मराठी बातम्यामराठी ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याzee 24 taas marathi news livezee 24 taas marathi newsझी मराठी बातम्याझी २४ तासझी २४ तास मराठीझी २४ तास ताज्या बातम्याआजच्या ताज्या बातम्याताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
Read More