Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुसळधार पावसानंतर मुंबईच्या तालावतील मगर फिरु लागली रस्त्यावर; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

आयआयटी मुंबईच्या पवई येथील परिसरात मगर मुक्तसंचार करताना आढळून आली आहे. मंगळवारी रात्री साधारण सहा फूट लांबीची मगर येथील रहिवाशांना वावरताना दिसली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 मुसळधार पावसानंतर मुंबईच्या तालावतील मगर फिरु लागली रस्त्यावर; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Crocodile In Powai Lake Mumbai : मुसळधरा पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. अशातच मुसळधार पावसानंतर मुंबईच्या तालावतील मगर फिरु लागली आहे.  थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावर फिरणारी मगर पाहून नागरिक भयभित झाले आहेत. 

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने आयआयटी मुंबईच्या पवई येथील परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन घडणे हे आता नवीन नाही. याचबरोबर पवई तालावाला लागूनच हा परिसर असल्याने मागील काही वर्षांत पवईच्या रस्त्यांवर आता मगरीही मुक्तसंचार करु लागल्या आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास लेक साईट परिसरात येथे एक मगर रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले. मगर रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, काही वेळाने मगर पुन्हा तलावात निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मुंबईत तुफन पाऊस

ठरलेल्या तारखेपेक्षा 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूननं मुंबापुरीची तुंबापुरी केली. मुंबईत सलग झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबई ठिकठिकाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. पाऊस लवकर येणार याची कल्पना असतानाही मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन तसंच एमएमआरडीए प्रशासन गाफील राहिल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणची नालेसफाईच अर्धवट असल्यानं मुंबई तुंबल्याचं पाहायला मिळालं. अनेक रेल्वेस्टेशन परिसरांना स्विमिंग पूलचं स्वरुप आलं होतं. सायन, माटुंगा, किंग्ज सर्कल, हिंदमाता, दादर, मस्जिद बंदर,  CSMT आणि चर्चगेट स्टेशन परिसरात पाणी साचलं होतं. हिंदमाता परिसरात पाणी उपसणारा पंपच बंद असल्यानं सात तास या भागात पाणी साचलं होतं. मंत्रालयाच्या परिसरातही पावसाचं पाणी साचलं होतं. 

 

Read More