Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दाऊदचा 'टकला' फुटला, धक्कादायक माहिती उघड...

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून त्याला पाकिस्तानी रेंजर्सचं सुरक्षाकडं दिलं जातं, असा धक्कादायक खुलासा फारुख टकलाने केलाय. 

दाऊदचा 'टकला' फुटला, धक्कादायक माहिती उघड...

मुंबई : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून त्याला पाकिस्तानी रेंजर्सचं सुरक्षाकडं दिलं जातं, असा धक्कादायक खुलासा फारुख टकलाने केलाय. 

गेल्या आठवड्यात १९९३ बॉम्बस्फोटातला आरोपी आणि कुख्यात दाऊद इब्राहिमचा मोठा हस्तक असलेल्या फारुख टकला या कुख्यात दहशतवाद्याला बेड्या ठोकून मुंबईत आणण्यात आलं. याच टकलाच्या चौकशीदरम्यान हा धक्कादायक खुलासा झालाय.

दाऊदवर जीवघेणा हल्ला

दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांचं संरक्षण हे पाकिस्तानी रेंजर्स करतात, असं त्यानं म्हटलंय. तसंच दाऊदवर दोनदा जीवघेणा हल्ला झाल्याची माहितीही टकलाने दिलीय. 

दाऊद 'अंड्या'वर...

दाऊदला पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये असणाऱ्या 'अंडा' बेटावर लपवलं जातं, अशी माहिती तपास यंत्रणांना सूत्रांकडून मिळालीय. 

भारताकडून दबाव वाढताच दाऊदला याच अंडा बेटावर लपवलं जातं. तिथं पाकिस्तानी अधिकारी सतत दाऊदच्या संपर्कात असतात, अशी माहितीही यंत्रणांना मिळालीय. 

परदेशी नेत्यांपासून दाऊदला दूर ठेवण्यासाठीच इथं लपवण्यात येतं. शिवाय पाकिस्तानी अधिकारी सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून दाऊदच्या संपर्कात असतात, अशी माहितीही यंत्रणांना मिळालीय. 

या माहितीच्या आधारे आता फारुख टकलाची चौकशी करण्यात येणार आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

Read More