Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू 

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वतः ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. 

'लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे परंतु आता असे दिसते की, मी स्वतः थोडावेळ थांबावे आणि थोडा वेळ स्वतःसाठी घ्यावा अशी देवाची इच्छा आहे!' त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे मी काळजी घेत आहे. देवेंद्र फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत असून आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्याची विनंती केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी सोलापूर दौरा केला होता. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली होती.

Read More