Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आता डायबेटीस रूग्णांना सावध करणारी बातमी

Diabetes drugs bogus? ​: आता डायबेटीस रूग्णांना सावध करणारी बातमी. माफियांनी नकली औषधं आणि बनावट स्ट्रीप्सचा बाजार मांडला आहे. 

आता डायबेटीस रूग्णांना सावध करणारी बातमी

प्रशांत अंकुशराव / मुंबई : Diabetes drugs bogus? : आता डायबेटीस रूग्णांना सावध करणारी बातमी. रक्तातील शुगर तपासण्यासाठी आपण घरच्या घरी शुगर टेस्ट करतो. शिवाय डायबेटीसच्या रूग्णांना नियमीतपणे गोळ्या-औषधं घ्याव्या लागतात. मात्र याचाच फायदा घेत माफियांनी नकली औषधं आणि बनावट स्ट्रीप्सचा बाजार मांडला आहे. (Diabetes : Fake blood sugar measuring strips)

बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली घराघरात डायबेटीसचे पेशंट वाढलेत. तुम्ही जर डायबेटीस पेशंट असाल तर वेळीच सावध व्हा, कारण सध्या बाजारात डायबेटीजच्या नकली औषधांचा सुळसुळाट झालाय. इतकच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी ज्या टेस्ट स्ट्रिप्स वापरल्या जातात त्या देखील नकली असल्याचं उघड झालंय. मुंबई पोलिसांनी या गोरखधंद्याचा पर्दाफाश केलाय. दक्षिण मुंबईतल्या प्रिन्सेस स्ट्रीट इथं एका मोठ्या दुकानात धाड टाकत पोलिसांनी वन टच कंपनीच्या तब्बल 5 लाख नकली स्ट्रीप्स हस्तगत केल्या आहेत. या स्ट्रीप्सच्या एका बॉक्सची अवघ्या 50 रूपयांत खरेदी केली जायची आणि सामान्यांना हाच बॉक्स 650 रूपयात विकला जायचा. 

भारतात दर आठ सेकंदाला दोन लोकांना नव्यानं डायबेटीस होतो, तर दर आठ सेकंदांनी डायबेटीसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू होतो. डायबेटीस वाढीला ब-याच अंशी नकली औषधं कारणीभूत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे स्वस्ताईच्या नादाला लागून अशा बनावट औषधांना बळी पडू नका. कुणी नकली स्ट्रीप्स किंवा नकली औषधांचा बाजार मांडत असेल तर संबंधित यंत्रणांना तात्काळ माहिती द्या, कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे. 

Read More