Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सैफवर झालेल्या हल्ल्यासारखाच प्रकार: पाईपवरुन चढला अन्...; मुंबईत 2 कोटींच्या हिऱ्यांची चोरी

Saif Ali Khan Attack Case Like Robbery: मुंबईमधील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या वांद्रे येथे पुन्हा एकदा सैफ अली खानवरील हल्ल्याशी साधर्म्य साधाणारे चोरीचे प्रकरण घडले आहे.

सैफवर झालेल्या हल्ल्यासारखाच प्रकार: पाईपवरुन चढला अन्...; मुंबईत 2 कोटींच्या हिऱ्यांची चोरी

Saif Ali Khan Attack Case Like Robbery: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील उच्चभ्रूंचा परिसर असलेलं वांद्रे पुन्हा एकदा अशाच हल्ल्याने हादरुन गेलं आहे. वांद्र्यातील एका गगनचुंबी इमारतीत सैफ अली खानच्या घारी झालेल्या चोरीसारखाच प्रकार घडला आहे. या चोरीमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचे प्रीमियम दागिने चोरीला गेले आहेत. हा दरोडेखोर, पाईपवरुन चढवून हैदराबादमधील एका ब्रँडच्या कार्यालयात पोहचला. या आरोपीने इमारतीच्या जिन्याचाही वापर केल्याचं समोर आलं आहे.

नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 9 मार्च रोजी वांद्रे पश्चिम येथील टर्नर हाइट्स इमारतीत एक चोर घुसला. हा चोर इमारतीचा जिना चढून सहाव्या मजल्यावर गेला. त्यानंतर तो खिडकीतून बाहेर जाऊन पाईपचा वापर करून हैदराबादस्थित एका प्रीमियम ज्वेलरी ब्रँडच्या प्रशासकीय कार्यालयात घुसला. या ठिकाणी त्याने 1 कोटी 90 लाख रुपयांचे हिरे घेऊन पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 2786 ग्रॅम वजनाच्या हिऱ्यांचे पाच बॉक्स घेऊन पळून गेला. या प्रकरणामध्ये समर्थ बजाज यांनी तक्रार दाखल केली आहे. समर्थ बजाज हे गुरु नानक रोडवरील टर्नर हाइट्समधील ज्वेलरी ब्रँडचे शोरूम आणि प्रशासकीय कार्यालय चालवतात.

कर्मचाऱ्याला 5 बॉक्स गायब असल्याचं दिसलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मार्च रोजी रात्री सव्वाआठ वाजता बजाजचा कर्मचारी अनिल याने दुकानाला कुलूप लावले आणि 10 मार्च रोजी सकाळी सव्वा दहा वाजता कुणाल नाव्याच्या कर्मचाऱ्याने दुकान उघडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर कुणालने त्याच्या नित्यक्रमानुसार चावीने आतील लॉकर उघडला. आत ठेवलेल्या दागिन्यांच्या 26 पेट्यांपैकी पाच पेट्या गायब असल्याचे लक्षात आले. कुणालने ताबडतोब बजाज यांना फोन करुन याबद्दल कळवले. माहिती मिळताच बजाज यांनी दुकानात धाव घेतली. तपासणी केल्यानंतर बजाज यांना 2786 ग्रॅम दागिने चोरीला गेल्याचे आढळले. त्यांनी वांद्रे पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीमधून मिळाला पुरावा

उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना 9 मार्चच्या रात्री एक व्यक्ती खिडकीतून ऑफिसमध्ये घुसला आणि त्याने सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्याचं दिसून आलं आहे. खिडकीचा काचही तुटलेली आढळून आली आहे. सध्या या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत. इतर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Read More