Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

डोंबिवलीत एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट

आजूबाजूची जमीन हादरली.....

डोंबिवलीत एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट

डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी फेज 2 येथे असणाऱ्या एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. या परिसरात असणाऱ्या अंबर केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट झाला. स्फोटाचं स्परुप इतकं भीषण होतं की, यामुळं आजुबाजूचा परिसर हादरला. 

यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचा हादरा सदर परिसराला बसला होता. त्यामुळं नजीकच्या सपिरसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान, यामध्ये कोणाला दुखापत झाल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असं असलं तरीही स्फोटाच्या हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. 

fallbacks

fallbacks

अंबर केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळं आजुबाजूच्या कंपन्यांचं नुकसान झाल्याचं कळत आहे. तर, या परिसरात रसायनांचा वासही पसरला आहे. 

 

Read More