Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

ड्रग्ज कनेक्शन : रियाने ड्रग्ज मागितल्याची रकुलची एनसीबी चौकशीत कबुली

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत आता अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. रिया चक्रवर्ती हिने ड्रग्ज मागितल्याची कबुली रकुल प्रीतसिंह हिने दिली आहे.  

ड्रग्ज कनेक्शन : रियाने ड्रग्ज मागितल्याची रकुलची एनसीबी चौकशीत कबुली

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत आता अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. रिया चक्रवर्ती हिने ड्रग्ज मागितल्याची कबुली रकुल प्रीतसिंह हिने दिली आहे. एनसीबीच्या चौकशीत ही कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, आपण कधीही ड्रग्ज न घेतल्याचा रकुलचा दावा आहे. एनसीबीकडून रकुलची पाच तास चौकशी करण्यात आली. 

हो, मी ड्रग्जबद्दल व्हॉटसअप चॅट केले. हो, रियाने माझ्याकडे ड्रग्ज मागितले. ड्रग्जवाल्या व्हॉटसअप ग्रुपची अॅडमिन दीपिका पदुकोण होती, ही अत्यंत खळबळजनक कबुली रकुल प्रीत सिंहने दिली आहे. एनसीबीने रकुल प्रीतची चौकशी केली. त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रकुलने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार आणि आणखी कोण सापडणार याची उत्सुकता आहे. 

रकूलने काय सांगितले?

आपण ड्रग्जसंदर्भात चॅट करत होतो. 
रियाबरोबर ड्रग्जसंदर्भात व्हॉटसअॅप चॅट होत होते. 
२०१८ मध्ये आम्हा दोघींचं ड्रग्जसंदर्भात व्हॉटसअप चॅट झाले होते. 
रिया माझ्याकडे ड्रग्ज मागत होती 
दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, जया साह आणि दीपिका यांचा एक ड्रग्जवाला ग्रुप होता 
आणि या ड्रग्जवाल्या व्हॉटसअॅप ग्रुपची दीपिका अॅडमिन होती, अशी खळबळजनक कबुली रकुलनं दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
 
ड्रग्ज घेतले नसल्याचे रकुलने एनसीबीला सांगितले आहे. दरम्यान, पाच तासानंतर रकुलची आजची चौकशी संपली. पण यामध्ये ज्या ड्रग्जवाल्या व्हॉटसअप गुपची अॅडमिन दीपिका होती, असे सांगून रकुलनं दीपिकाच्या अडचणी मात्र वाढवल्याचे दिसून येत आहे. आता २६ सप्टेंबरला दीपिकाच्या चौकशीत हाच प्रश्न तिलाही विचारला जाण्याची शक्यता आहे. 

Read More