Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नशेत धूंद, अर्धनग्न, मराठी महिलेसोबत... MNS नेत्याच्या मुलाचा प्रताप; मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेसोबत गैरवर्तन Watch Video

MNS Leader Son Video : मनसे नेत्याच्या मुलाने नशेत धूंद अवस्थेत एका महिलेच्या कारला धडक दिली अन् अपशब्द वापरल्यामुळे वाद विकोपाला गेला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नशेत धूंद, अर्धनग्न, मराठी महिलेसोबत... MNS नेत्याच्या मुलाचा प्रताप; मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेसोबत गैरवर्तन Watch Video

हिंदी सक्तीला विरोध करता मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. पण त्यांचं एकत्र येणं अनेक बाजूंनी सध्या चर्चेचा विषय आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका मनसे नेत्याच्या मुलाने मंद्यधुद्ध अवस्थेत गैरप्रकार केला आहे.

मुंबईतील अंधेरी भागात राखी सावंतची एकेकाळची मैत्रीण राजश्री मोरे हिच्यासोबत मनसे नेत्याच्या मुलाने गैरवर्तणूक केलं आहे. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, दारू पिऊन, अर्धनग्न, मनसे नेत्याचा मुलगा एका मराठी भाषिक महिलेला शिवीगाळ करत आहे. त्याशिवाय, तो मुलगा त्याच्या वडिलांच्या नावाने धमकावत असल्याच दिसत आहे. मराठी स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा दावा करणाऱ्यांचा खरा चेहरा पहा. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री ठाकरे हिने आरोप केला आहे की, अंधेरी परिसरात एका तरुणाने तिच्या गाडीला धडक दिली. नंतर दारू प्यायलेल्या तरुणाने तिला धमकी दिली की, त्याचे वडील मनसेचे उपाध्यक्ष आहेत. राजश्री मोरे यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी तो तरुण अर्धनग्न अवस्थेत होता. राजश्री मोरेच्या गाडीला धडक देणारा आरोपी मनसे नेते जावेद शेख (Javed shaikh mns) यांचा मुलगा आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलाचे नाव राहिल जावेद शेख आहे. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख याने राजश्री मोरे यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राजश्री मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहिल जावेद शेख यांनी त्यांच्या कारला धडक दिल्याचे दिसून येते. टक्कर झाल्यानंतर राहिल त्याच्या कारमधून उतरला आणि राजश्री यांच्याशी जोरदार वाद झाला. व्हिडिओमध्ये राजकारण्याचा मुलगा अर्धनग्न दिसत आहे आणि तो मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राजश्री यांनी राहिलवर कडक कारवाईची मागणी केली आहे आणि घटनेदरम्यान ती घाबरली होती असे म्हटले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मनसे आणि राज ठाकरे यांना कोंडीत पकडले आहे.

Read More