Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नेव्हल कर्मचाऱ्याने गोळी झाडून केली आत्महत्या

ड्युटीवर असताना घडला प्रकार 

नेव्हल कर्मचाऱ्याने गोळी झाडून केली आत्महत्या

मुंबई : घाटकोपरच्या नेव्हल डेपोत एका नेव्हल कर्मचाऱ्याने  स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रायपाल सिंह कर्मचाऱ्याचे नाव आहे .आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही, या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. नेव्ही मध्ये गार्ड म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घाटकोपर पोलीस ठाणेचे अधिकारी घटना स्थळावर पोहोचले आहेत. 

घाटकोपर येथील मटेरियल ऑर्गनायझेशनशी संबंधित 106 डीएससी पलटणातील शिपाई रायपाल पाल सिंग  यांनी 18 ऑक्टोबर 20 रोजी ड्युटिवर असताना गोळी झाडून आत्महत्या केली. ड्यूटी पोस्टवर बंदुकीच्या गोळीमुळे जखमी झाले होते. दोन फेऱ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.  स्वतःवर झाडल्या गेलेल्या सर्व्हिस रायफल त्यांच्या शेजारी सापडली होती. 

घाटकोपर येथील सिव्हिल पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि नौदलाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह जवळच्या राजावाडी सिव्हील रुग्णालयात नेण्यात आला. मृताचे गाव व पी.ओ. अमरगड, जि. पंजाबमधील संगरूर. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

Read More