Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे, कलमापन चाचणी जाहीर

गेल्या दोन वर्षांपासून सरकारच्या वतीने १० वीनंतर कलमापन चाचणी घेतली जाते.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे, कलमापन चाचणी जाहीर

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून सरकारच्या वतीने १० वीनंतर कलमापन चाचणी घेतली जाते. यावर्षी १७ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी कलमापन चाचणी दिली. दहावीच्या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणी २०१८ चा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला. त्या अहवालानुसार सर्वाधिक २१ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्राकडे कल नोंदवलाय. त्यानंतर फाईन आर्टकडे १८ टक्के विद्यार्थ्यांनी कल नोंदवलाय. पोलिस, सैन्य दलात जाण्यासाठी १५ टक्के विद्यार्थ्यांनी कल नोंदवला. १३ टक्के कृषी,  १२ टक्के विज्ञान, १० टक्के टेक्निकल आणि कला क्षेत्रासाठी  ११% मुलांनी कल दर्शवला.

विद्यार्थी त्यांच्या SSC board क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल ऑनलाईन प्राप्त करू शकतात. त्यासाठी www.mahacareermitra.in या पोर्टलवर अहवाल मिळू शकेल. तसंच प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलंय.

 

Read More