Kishori Pednekar News : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. वरळी एसआरए कथित घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. (Political News in Marathi) त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Mumbai News in Marathi)
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईप्रसाद याला अटक झाल्यास 1 लाखांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे वरळी एसआरए इमारतीमधील सदनिका बळकावल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. मुंबईतील एका विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचा मुलगा, त्यांच्याशी संबंधित एक फर्म आणि इतर तिघांना समन्स बजावले होते. यावेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की ते कथित बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर आणि अंतर्गत इतर गुन्ह्यांसाठी प्रथमदर्शनी जबाबदार आहेत.
Live Update :
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 28, 2023
वरळी एसआरए कथित घोटाळा प्रकरण
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा
किशोरी पेडणेकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
अटक झाल्यास 1 लाखांच्या जामिनावर सुटका होणार
पेडणेकरांना देशाबाहेर जाण्यास मनाई@KiritSomaiya #kishoripednekar #MaharashtraPolitics pic.twitter.com/4eGEjrEgUJ
तक्रार आणि संबंधित कागदपत्रे आणि तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे, न्यायालयाने आरोपींना 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीचे संचालक बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि कंपनी कायद्यांतर्गत दंडनीय अशा इतर गुन्ह्यांसाठी प्रथमदर्शनी जबाबदार आहेत, कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
याप्रकरणी वांद्रेच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशानं पेडणेकरांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. पेडणेकर यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, मात्र सर्व आरोपींना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.