Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कपडे धूत असतानाच वॉशिंग मशीनचा स्फोट, वेळीच सावध व्हा

Washing Machine Blast : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुमच्या घरी वॉशिंग मशीन असेल तर ही बातमी पाहा आणि वेळीच सावध व्हा. 

कपडे धूत असतानाच वॉशिंग मशीनचा स्फोट, वेळीच सावध व्हा

वसई : Washing Machine Blast : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुमच्या घरी वॉशिंग मशीन असेल तर ही बातमी पाहा आणि वेळीच सावध व्हा. कारण वसईच्या ओमनगर परिसरात कपडे धूत असतानाच वॉशिंग मशीनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Explosion of washing machine while washing clothes)

कपडे धूत असताना शॉर्टसर्किट होऊन हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र, स्फोट झाल्याने आग लागली.

वेळीच अग्निशमन दलाचे जवान आणि माणिकपूर पोलीस आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पण, तुम्ही जर वॉशिंग मशीन वापरत असाल तर यापुढे काळजी घ्यावी.  

अशी घ्या काळजी

- घरामध्ये वॉशिंग मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवा
- मशीनची वायर उंदिर कुरतडणार नाही याची काळजी घ्या
- वायर तुटलेली किंवा कट झालेली असेल तर शॉर्ट सर्किट होऊ शकते
- शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होण्याचा मोठा धोका
- वॉशिंग मधीनला आग लागली तर पाणी मारु नका

Read More