Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Viral video : नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून बायको भररस्त्यात संतापली, अख्खी वाहतूक रोखली

तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत होता. तिने ओव्हरटेक करून गाडी थांबवली आणि गाडीच्या समोर आली. 

Viral video : नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून बायको भररस्त्यात संतापली, अख्खी वाहतूक रोखली

Extra Marital Affairs: नवऱ्या बायकोच्या नात्यात विश्वास तुटला की सगळं नातचं एका क्षणात संपतं. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधच्या घटना वाढल्या आहेत. यामागे कारणंही वेगवेगळे आहेत. मात्र जेव्हा एक बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत बघते तेव्हा तिचं काय होतं हे दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

आणि तिने अख्खी वाहतूक रोखली...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला बराच वेळ रेंज रोव्हरचा पाठलाग करत होती, ज्यामध्ये तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत होता. तिने ओव्हरटेक करून गाडी थांबवली आणि गाडीच्या समोर आली. 

पाहा व्हिडीओ

एवढंच नाही तर गाडीच्या बोनेटवरही ती चढली... रस्त्यावर आरडाओरडा करण्यापर्यंत तिने पतीला जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढले.नवऱ्या बायकोच्या या भांडण्यामुळे कितीतरी तास रस्त्याची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर घटनास्थळावर वाहतूक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ जुना असून सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल  होतो आहे. ही घटना मुंबईतील पेडर रोडमध्ये घडली होती. 

 

Read More