सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्या व्हिडीओ मागची सत्यता आपल्यासमोर किती येते? असाच एक अंधेरी परिसरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधून श्वानांना खावू घालणाऱ्या फीडर्सचा छळ का केला जातोय? अशा मथळ्याखाली हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
अनेकदा व्हिडीओ व्हायरल होतो पण त्यामागची सत्यता समोर येत नाही. फक्त त्यावर कमेंट करुन किंवा शेअर करुन आपलं मत व्यक्तं केलं जातं.
अंधेरीतील MIDC मधील बिंद्रा सातेरी लेगसी या इमारतीमधील हा प्रकार. येथे राहणाऱ्या विलास चोरामळे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मारुन टाकणार का कुत्र्यांना?असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर माझ्या मुलाला कुणी त्रास दिला तर मी मारणार? अशा पद्धतीचा वाद होताना दिसत आहे. हा व्हिडीओ PURE ANIMAL LOVERS PAL WELFARE FOUNDATION या सोशल मिडिया पेजवर अपलोड करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विलास चोरामळे यांच्या १४ वर्षांच्या मुलावर रस्त्यावरील भटक्या श्वानाने हल्ला केला. या हल्ल्यात तो मुलगा प्रचंड प्रमाणात घाबरला. मुलाला घाबरलेल्या अवस्थेत पाहिल्यामुळे विलास चोरामळे आणि त्यांची पत्नी घाबरले आणि सोसायटीच्या आवारात जाऊन नेमका काय प्रकार घडला ते पाहू लागले.
याच इमारतीत राहणाऱ्या प्राणीप्रेमी हर्षदा पडवळ यांचा वाद झाला. हर्षदा पडवाळ कायम येथील श्वानांना खायला घालतात. विलास आणि हर्षदा यांच्यात या दरम्यान वाद झाला आणि त्या वादाचा अर्धवट व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला.
या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर आहे. श्वान प्रेमींना त्रास देण्याचा उद्देश नसतो. मात्र अनेकदा खाण्याच्या उद्देशाने हे श्वान मुलांच्या जवळ येतात त्यांच्यावर हल्ले करतात. अशावेळी लहान मुलं घाबरु शकतात. असा प्रकार घडू नये म्हणून झालेल्या चर्चेचा वेगळं वळण दिलं आहे.
या प्रकरणात विलास चोरामळे यांची पत्नी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. या व्हिडीओवर समिश्र प्रतिक्रिया आहे. अनेकांना या व्हिडीओत दिसतंय तेच सत्य आहे. असं समजून भाष्य केलं जात आहे. तर काहीजण सोसायटी आणि इतर रहिवाशी श्वानप्रेमींमुळे कोणता त्रास सहन करतात यावर भाष्य करत आहे.
हा सगळा प्रकार इतका धक्कादायक आहे की, यामुळे चोरामळे कुटुंबाला मनःस्ताप सहन करावा लागला. हा व्हिडिओ ज्या पेजवर अपडेट करण्यात आला. त्यावर चोरामळे यांचा नंबर आणि पत्ता देण्यात आला आहे. त्यांना फोन करुन असभ्य भाषेत बोलले जात आहे तसेच त्यांना शिवीगाळ केली जात आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर करणे हे चुकीचे आहे. नाण्याला दोन बाजू असतात. आपण दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे. श्वानांमुळे अनेकदा इमारतीतील रहिवाशांना त्रास होतो. भटकी कुत्री सोसायटीमध्ये सर्रास फिरतात यावर आळा बसणं तेवढंच गरजेचं आहे.