Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुलाच्या निष्काळजीपणामुळे फॅशन डिझायनर सुनिता यांचा मृत्यू

गुरुवारी माय-लेकाचं मालमत्तेवरुन कडाक्याचे भांडण झालं. 

मुलाच्या निष्काळजीपणामुळे फॅशन डिझायनर सुनिता यांचा मृत्यू

मुंबई : फॅशन डिझायनर सुनिता सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा मुलगा लक्ष्य याला अटक करण्यात आलीय. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी त्याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केलाय. लक्ष्य स्वतः एक मॉडेल असून गुरुवारी माय-लेकाचं मालमत्तेवरुन कडाक्याचे भांडण झालं.

रागाच्या भरात आपटलं

 दोघांत हाणामारीसुद्धा झाली. या भांडणादरम्यान लक्ष्यने रागाच्या भरात सुनीता यांना न्हाणी घरात ढकललं.

यामुळे सुनीता वॉश बेसिनवर आपटल्या. यांत जखमी झालेल्या सुनीता यांचा मृत्यू झाला.

ही बाब लक्ष्यने सुरुवातीला लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकशीत सुनीता यांच्या मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर लक्ष्यला अटक करण्यात आली. 

Read More