Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

गॅस सिलिंडचा स्फोटानंतर अंधेरीत इमारतीला आग, एक जखमी

अंधेरीमधील यारीरोड परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यालाला भीषण आग लागली. 

गॅस सिलिंडचा स्फोटानंतर अंधेरीत इमारतीला आग, एक जखमी

मुंबई : अंधेरीमधील यारीरोड परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यालाला भीषण आग लागली होती. गॅस सिलिंडचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली. या आगीत एक जण जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

अंधेरीत मझील मस्जिद चौकातील सरिता इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला त्यानंतर आगीचा भडका उडाला. या आगीत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  

Read More