मुंबई : काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली. येथील ईस्टर्न मेटल वर्क कंपनीला ही आग लागली होती. या कंपनीच्या बाजूलाच असलेल्या गोदामाला आग लागली होती. आता ही आग विजण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.
येथील एका फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्याने आगीची तीव्रता अधिक होती. अग्नीशमनच्या दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. १ ते दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलंय. मात्र आगीचं स्वरूप पाहता इथे मोठ् नुकसान झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
Mumbai: Fire is at a godown of Eastel Metal Company in Kalachowki. No casualty reported pic.twitter.com/NBuApoXLJn
— ANI (@ANI) March 6, 2018