Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एका सिगरेटसाठी फुटल्या इतक्या बिअरच्या बाटल्या

मनीष पान शॉप पानटपरीवर एक तरूण सिगरेट मागण्यासाठी आला. पण...  

एका सिगरेटसाठी फुटल्या इतक्या बिअरच्या बाटल्या

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : येथील संभाजी चौकात एक विचित्र घटना घडलीय. मनीष पान शॉप पानटपरीवर एक तरुण सिगरेट मागण्यासाठी आला.

टपरी चालकाकडे हा तरुण फुकटात सिगरेट मागू लागला. पण, टपरी चालकाने त्याला सिगरेट देण्यास नकार दिला. यामुळे त्या तरुणाला राग आला. त्यावेळी तो तिथून निघून गेला. पण काही वेळां आपल्या साथीदारासोबत तो पुन्हा तिथे आला.

त्यावेळी त्याने आपल्या साथीदारासह तिथे येऊन टपरी चालकाच्या दिशेने बियरच्या दोन बाटल्या फेकल्या. यातील एक बाटली टपरी चालकाने आपल्या हातावर झेलली. तर, दुसरी बाटली टपरी चालकाच्या डोक्यात जाऊन फुटली.

या बाटली हल्यात टपरी चालकाच्या डोक्याला इजा झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या तरुणांचा शोध घेत आहेत.

Read More