Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

व्हिडीओ व्हायरल : चार वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण

मुंबईत रविवारी एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओत एक व्यक्ती चार वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसून येतं आहे.

 व्हिडीओ व्हायरल : चार वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण

मुंबई : मुंबईत रविवारी एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओत एक व्यक्ती चार वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसून येतं आहे. या व्हिडिओबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, चुनाभट्टी भागात अशीर नावाच्या व्यक्तीने आपल्याच चार वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचं समोर आलं. 

याप्रकरणी मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मारहाण का केली याची चौकशी सुरु आहे. या चार वर्षाच्या मुलाला सायन रुग्णालय़ात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्य़ावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलीस योग्य ती कारवाई करणार आहेत.

Read More