Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दिव्यात परप्रांतीय-मराठी वाद; तरुणावर चाकूने हल्ला, CCTV पाहा

दिव्यात परप्रांतीय - मराठी वाद पेटला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद 

दिव्यात परप्रांतीय-मराठी वाद; तरुणावर चाकूने हल्ला, CCTV पाहा

दिव्यातील बेडेकर नगर येथे एका परप्रांतीय फेरीवाल्याने कुटुंबासह एका मराठी तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुंबईत अशा प्रकारे परप्रांतीय मराठी वाद पहिल्यांदा झालेला नाही. याआधी देखील असे प्रकार घडले आहेत. 

बेडेकर नगर येथे राहणारा जितेश उत्तेकर हा तरुण आपला टेम्पो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर काढत असताना त्याच्या टेम्पोचा फेरीवाल्याच्या छत्रीला धक्का लागला. ज्यामुळे फेरीवाल्याचे आणि या तरुणाचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी येथील फेरीवाल्यांच्या कुटुंबातील तीन पुरुष आणि एक महिला सदस्याने आपल्या जवळच्या चाकूने या तरुणाच्या अंगावर धावून जात त्यास मारहाण केली. यात हा तरुण गंभीर जखमी झाला. हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

या प्रकारानंतर रस्त्यावर गर्दी जमा झाली. जमावाने परप्रांतीय कुटुंबाला आणि मराठी तरुणाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Read More