Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतील गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचा मोठा निर्णय

Ganesh Mandal Pandal Fine: मुंबईत मोठ्या प्रमाणात गणपती मंडळ मोठे मोठ मंडप उभारतात. त्यासाठी रस्त्यावरही खड्डे खोदतात. यंदा या गणेश मंडळांनी रस्त्यावर खड्डे खोदून मंडप उभारल्यास त्यांना 15 हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. पण आता या निर्णयाबद्दल महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचा मोठा निर्णय

Ganesh Mandal Pandal Fine: महाराष्ट्रापासून देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. घरोघरी बाप्पाचा आगमन होतं. त्यासोबत मोठ्या मोठ्या मंडपात गणेशाचं आगमन होतं. या गणेशोत्सवासाठी मोठे मोठ मंडप उभारले जातात. त्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर खड्डे खोदले जातात, याचा परिणाम रस्ते खराब होता आणि अनेक वेळा रस्ते अपघाताला कारणीभूत ठरतो. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी 15000 हजार शुल्क आकारण्यात येणार होते. ज्यामुळे गणेश मंडळ नाराज झाले होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रक्कम किती?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रक्कमेत कोणतीही वाढ करु नये, असे निर्देश दिले आहेत. आता जुन्या नियमानुसार केवळ 2000 हजार शुल्क आकारले जाणार आहे. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. या निर्णयाचे स्वागत करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले. (Ganeshotsav News ganesh mandals fine for pits for pandals reduced from rs 15000 to rs 2000 mumbai news in marathi)

नेमकं काय आहे प्रकरण?

2017 पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डा खोदल्यास 2 हजार रुपयांचा दंड द्यावा लागायचा. हाच दंडा यावर्षी मुंबई महापालिकेने नव्या नियमावलीनुसार थेट एका खड्ड्यासाठी 15 हजार आकाराण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबईतील अनेक छोट्या गणपती मंडळांनी प्रंचड नाराजी व्यक्त केली होती. छोट्या गणेश मंडळांना हा खर्च पडरवडणारा नसल्याने सरकारने यात लक्ष घालाव आणि दंड कमी करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर जुन्या नियमानुसार यंदाही 2000 हजारांचाच दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील गणेश मंडळांमध्ये उत्साहाच आणि आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्भूमीवर हा निर्णय सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

Read More