Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

बॉलिवूडमधील एका मोठ्या सेलिब्रिटीच्या घराजवळ सामूहिक बलात्कार, बॅायफ्रेंडसह तीन आरोपी अटकेत

बहिणीच्या सांगण्यावरून पीडितेने तिचा प्रियकर आणि दोन मित्रांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सामूहिक बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली.

बॉलिवूडमधील एका मोठ्या सेलिब्रिटीच्या घराजवळ सामूहिक बलात्कार, बॅायफ्रेंडसह तीन आरोपी अटकेत

वांद्रे : मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड भागात 20 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात, मुलीच्या प्रियकरासह इतर दोन मित्रांनाही अटक करण्यात आली आहे. ही मुलगी तिच्या प्रियकरासह इतर दोन मित्रांसोबत वांद्रे पश्चिमेकडील समुद्रकिनारी असलेल्या बॅन्डस्टँड भागात फिरायला गेली होती. त्यावेळेस मुलीचा प्रियकर आणि दोन मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता घडली आहे.

बहिणीच्या सांगण्यावरून पीडितेने तिचा प्रियकर आणि दोन मित्रांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सामूहिक बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली. अटक केलेले तिन्ही आरोपी 20 ते 23 वर्षांचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बॉलीवूडच्या एका अतिशय मोठ्या सेलिब्रिटीच्या घराजवळ घडली.

नक्की काय घडले?

11 मे रोजी रात्री दोन बाईकवर पीडित मुलगी तिचा प्रियकर आणि दोन मित्रांसह वांद्रे पश्चिमेकडील समुद्रकिनारी असलेल्या बँड स्टँड भागात फिरण्यासाठी गेली. तेव्हा  रात्र जास्त होऊ लागली आणि कोरोनाच्या बंदीमुळे त्या भागात कोणीही नाही या गोष्टीचा फायदा या तिन्ही मुलांनी घेतला आणि त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर ते चौघेही आपआपल्या घरी निघून आले. भीतीने या मुलीने आधी कोणाला काही सांगितले नाही. त्यानंतर त्या मुलीने आपल्या पोटात दुखत आहे असे आपल्या बहिणीला सांगितले. त्यानंतर नक्की काय होत आहे याची सविस्तर विचापूस केली असता. त्यामुलीने सगळी घटना आपल्या बहिणीला सांगितली त्यानंतर त्या दोघींनी दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला.

सुरुवातीला पीडितेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन तिन्ही आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि नंतर वांद्रे पोलिसांनी ही घटना वांद्रे भागात घडल्यामुळे तेथे गुन्हा दाखल केला.

वांद्रे पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपावरून तिन्ही आरोपींना अटक केली. तिन्ही आरोपींना 19 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read More