मुंबईकरांसाठी आंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरण आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्ण क्षमतेनं भरलंय. या धरणातून वैतरणा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रात्रीच या धरणाचा जलसाठा 99.74 टक्के एवढा झाला होता. धरणाच्या पाठणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आज सकाळीच हे धरण ओव्हर फ्लो झालंय.