Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

45 व्या मजल्यावरुन उडी मारुन 17 वर्षीय तरुणीने स्वत:ला संपवलं; डॉक्टरला म्हणालेली, 'कधी ना कधी...'

Mumbai Suicide News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे.

45 व्या मजल्यावरुन उडी मारुन 17 वर्षीय तरुणीने स्वत:ला संपवलं; डॉक्टरला म्हणालेली, 'कधी ना कधी...'

Mumbai Suicide News Today: मुंबईत एक थरारक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या मुलीने 45 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. गोरेगाव येथे ही घटना मंगळवारी घडली आहे. आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसंच, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होती. तर, तिच्या बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली होती. त्यात लिहलं होतं की, मी स्वइच्छेने हा निर्णय घेत असून कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक वर्षांपासून ती डिप्रेशनशी झुंजत होती. गेल्या सहा वर्षांपासून ती डिप्रेशनमध्ये होती तिच्यावर उपचारदेखील सुरू होते. 

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार, याआधीही मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याबाबत तिच्यावर उपचार सुरू होते. तसंच, त्यांनी हेदेखील म्हटलं की, मनोविकारतज्ज्ञांना तिने एकदा सांगितले होती की, एकना एक दिवस सगळ्यांनाच मरायचं आहे. तर आपण का जगतोय? हा प्रश्न ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. वडिलांच्या जबाबानंतर पोलिसांनी काहीही संशयास्पद आढळले नसल्याची नोंद करत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

दरम्यान, सोमवारीदेखील मुंबईत अशीच एक घटना घडली आहे. विक्रोळीतील कम्मनवार नगर परिसरातदेखील एका तरुणीने 22 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. या तरुणीचीदेखील मानसिक व्यवस्था ठीक नसल्याचे समोर आले आहे. मानसिक तणाव असल्याने आयुष्यात अनेक बदल घडल्याने त्याला वैतागून तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पंचनामा करुन तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदनाचे अहवाल समोर आल्यानंतर खरे कारण समोर येणार आहे. 

Read More