Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सहकार मंत्री सुभाष देशमुखांना मोठा झटका, शासनाकडून अनुदान रद्द

 बोगस कागदपत्रांच्या आधारे लाटले 25 कोटी

सहकार मंत्री सुभाष देशमुखांना मोठा झटका, शासनाकडून अनुदान रद्द

मुंबई : लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला दिलेले अनुदान रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लोकमंगलने 25 कोटी रुपयांचे अनुदान लाटले होते. बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर शासनाने अनुदान रद्द केले आहे.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्यासाठी 25 कोटी रुपये अनुदान लाटल्याचा आरोप होता. त्यापैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती. ती परत घेण्याबाबत दुग्ध विकास आयुक्तांना कारवाई करण्याने शासनाने आदेश दिले आहेत. यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा झटका बसला आहे.

Read More