Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, रेणू शर्माने तक्रार घेतली मागे

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, रेणू शर्माने तक्रार घेतली मागे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) हिने बलात्काराची तक्रार (Rape complaint) मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने केस बंद होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी महिलेला अॅफिडेव्हीट सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तक्रार मागे घेतल्याने केस बंद होईल.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर 2006 पासून अत्याचार सुरु होते असं तिने तक्रारीत म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी 'झी 24 तास' कडे यासंदर्भात खुलासा करत सर्व आरोप फेटाळले होते. हे आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा मुंडे यांनी केला होता.

धनंजय मुंडे यांनी माझ्याशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. तुला बॉलिवूडमध्ये मोठ्या निर्मात्यांशी भेट घालून देईन आणि काम मिळवून देईन असे आश्वासन दिले असा आरोप रेणूने केला होता. या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधकांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

रेणू शर्मा हिने दिलेल्या तक्रारीनुसार ती 1997 साली आपल्या इंदौरच्या घरी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा भेटली होती. 1998 साली धनंजय मुंडे यांनी बहीण करुणा हिच्याशी लग्न केल्याचे रेणूचं म्हणणे आहे. लग्नाच्या बहाण्याने आपल्या बहिणीशी शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप तिने केलाय. धनंजय मुंडे यांनी 2012 मध्ये एनसीपीमध्ये प्रवेश केला होता.

या तरूणीने पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली होती. 

Read More