Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अर्धनग्न शेतकऱ्यांचा मोर्चा मानखुर्दमध्ये पोहोचला

मुंबईच्या मानखुर्दमधील खाडीपुलाजवळ सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

अर्धनग्न शेतकऱ्यांचा मोर्चा मानखुर्दमध्ये पोहोचला

नवी मुंबई : मुंबईच्या मानखुर्दमधील खाडीपुलाजवळ सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तब्बल १० तासांपासून हे शेतकरी अर्धनग्न अवस्थेत एका जागी बसून आहेत. १२ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावातून अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांनी या मोर्चाला सुरुवात केली.

आज हा मोर्चा मानखुर्दच्या वेशीवर येऊन धडकला, मात्र मानखुर्दजवळ पोलिसांनी या मोर्चाला अडवलं. मानखुर्द ते आझाद मैदान पोलीसांच्या वाहानातून येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. मात्र मोर्चेकऱ्यांनी उद्या पायी आझाद मैदानपर्यंत जाण्याच्या मागणीवर ठाम राहत खाडी पुलाजवळ ठिय्या मांडलं. औद्यागीक वसाहतीसाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला न मिळाल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलाय.

 

Read More