मुंबई : Down trains on Harbour line resumed after brief disruption due : हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळी झाल्याने पनवेल स्टेशनवर तोबा गर्दी दिसून येत आहे. हार्बर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी लोकल वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. गोवंडी जवळ रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.
गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली. मात्र ती विलंबाने
लोकल सेवा सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गिकेवर रुळाला तडे गेले होते. त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. पनवेलला गाड्या उशिरा पोहोचत असल्याने स्थाकावर मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळी झाल्याने पनवेल स्टेशनवर तोबा गर्दी । हार्बर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी लोकल वेळापत्रकाचे तीन तेरा ।
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 27, 2022
गोवंडी जवळ रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम
#Harbor #HarborLocal #Govandi #CentralRailway #Panvel #MumbaiLocal @Central_Railway pic.twitter.com/QcPOatvLnn
काल सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने अपघात झाला होता. मंगळवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी लाखोल्या वाहिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलच्या दिशेने जाणारी हार्बर रेल्वेसेवा काही काळासाठी बंद झाली होती. त्यानंतर अनेक स्थानकांवर गर्दी दिसून येत आहे.