Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान : शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान : शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाने साशन अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीबरोबरच आता राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जुलै २०१९मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली होती. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतीबरोबर घरांचेही नुकसान झाले होते. काही ठिकाणी धरण फुटले होते. तर पुरात अनेकांचे संसारही वाहून गेले होते. पावसामुळे घरेही जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे  अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हा  दिलासा मिळाला आहे.

 पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबात शासनाने जीआर जारी केला आहे. जुलै २०१९ या महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पूर आणि अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर काही ठिकाणी पिके वाहून गेली होती. पूर आणि अतिवृष्टीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची पिक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला गेला.  मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर शासन निर्णय काढून राज्य सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे.

Read More