Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी, वाशी ते ठाणे लोकल सेवा ठप्प

 Rain in Mumbai : मुंबईत आज पाहटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी, वाशी ते ठाणे लोकल सेवा ठप्प

मुंबई : Rain in Mumbai : मुंबईत आज पाहटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी थंडगार वातावरणाचा अनुभव घेतला आहे. दादर समुद्रकिनाऱ्यावर मुलं मनसोक्त खेळत आहेत.

मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली होती. आज सकाळी रिमझिम पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसाचा तडाखा रेल्वेला बसला. मध्ये रेल्वेच्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तर हार्बर मार्गावरही गाड्याही उशिराने धावत होत्या. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी सेवा पूर्णत: ठप्प होती. तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले.

अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. गोव्याच्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून सिंधुदुर्गात दाखल झाला आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात कालपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सून सिंधुदुर्गात दाखल झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केले. तर रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.

Read More