हवामान विभागाने नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलंय. पुढील २४ तासांत मुंबई, रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे आणि कोकण भागात अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. मुंबईच्या समुद्रात हायटाईडचा इशाराही देण्यात आला. पहिली हायटाईट ही सकाळी 9.19 मिनिटांनी झाली साधारण 3.88 मीटर उंच लाटा यावेळी उसळल्या. तर दुसरी हायटाईड रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी येणार आहे. यावेळी साधारण 3.42 मीटर उंच लाटा उसळणार आहेत.