Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत घर घरेदी करणे आणखी महाग होणार

मुंबईत घरांच्या किंमती वाढणार

मुंबईत घर घरेदी करणे आणखी महाग होणार

मुंबई : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहण्याऱ्या व्यक्तींसाठी थोडी निराश करणारी बातमी आहे. मुंबईत घर घरेदी करणे आता आणखी महाग होणार आहे. कारण मुंबईमध्ये एक टक्का जास्त स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. राज्य सरकारने मुंबईत मालमत्ता घ्यायची असेल तर एक टक्का जास्त स्टॅम्प ड्युटी भरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन अॅक्टमध्ये बदल केले जाणार आहेत. या अतिरिक्त स्टॅम्प ड्युटीमधून मिळणारे पैसे मेट्रो, मोनो रेल, फ्री वे, सी लिंक अशा प्रकल्पांच्या निधीसाठी वापरले जाणार आहेत.

 

Read More