Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांनो, आता तरी काळजी घ्या! फक्त मार्च महिन्यात तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ

मुंबईत एकाच महिन्यात बाधितांच्या संख्येत साडेपाच पट आणि मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. 

मुंबईकरांनो, आता तरी काळजी घ्या! फक्त मार्च महिन्यात तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ

मुंबई : संपूर्ण राज्यात कोरोना संसर्गाचा बेफाम वाढ होत आहे. मुंबईची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. मुंबईत कोरोना झपाटय़ाने वाढत असून मार्चमध्ये एकाच महिन्यात तब्बल 96 हजार 590 बाधित आढळले आहेत. 

फेब्रुवारीच्या संपूर्ण महिन्यात केवळ 17 हजार 473 रुग्ण आढळले होते. म्हणजेच एकाच महिन्यात बाधितांच्या संख्येत साडेपाच पट आणि मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. 

संपूर्ण फेब्रुवारीत मुंबईत केवळ 115 मृत्यू झाले होते, तर मार्चमधील एकूण मृतांची संख्या 230 झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता आठवड्याभरात बेडची संख्या 25 हजार करण्यासाठी पालिकेनं ठोस पावलं उचलली आहेत. 

Read More