Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल

पाच नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर पोहचले आहेत.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल

मुंबई : पारनेरमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या पाच नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर पोहचले आहेत. पारनेरचे नगरसेवक अजित पवारांकडे आले होते. त्यानंतर तेथून मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

पारनेर नगरपंचायतीमधील  शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता. मात्र आता हे पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

 

Read More