Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत Parle-G चं उत्पादन करणाऱ्या पार्ले ग्रुपवर आयकर विभागाची धाड; अनेक ठिकाणांवर रेड, सकाळपासून सर्च सुरु

Parle-G Income Tax Raid: मुंबईत कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरु आहे, जी सकाळपासून केली जात आहे. आयकर विभागाच्या फॉरेन असेट युनिट आणि मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंगच्या वतीने ही कारवाई केली जात आहे.    

मुंबईत Parle-G चं उत्पादन करणाऱ्या पार्ले ग्रुपवर आयकर विभागाची धाड; अनेक ठिकाणांवर रेड, सकाळपासून सर्च सुरु

मुंबईत पारले ग्रुपवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. पारले ग्रुप Parle-G, मोनॅको आणि इतर ब्रँडच्या नावे बिस्किटांचं उत्पादन करणारी कंपनी आहे. मुंबईतील कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. सकाळपासून ही कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्या फॉरेन असेट युनिट आणि मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंगच्या वतीने ही कारवाई केली जात आहे.  

प्राथमिक माहितीनुसार, करचोरी प्रकरणात पार्ले ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. छापेमारी पूर्ण झाल्यानंतर याबद्दल अधिक माहिती मिळेल. सध्या आकर विभाग कागदपत्रांची छाननी करण्यात व्यग्र आहे. 

FY24 मध्ये पार्ले-जीचा नफा वाढला

पीटीआयच्या वृत्तानुसार, पार्ले-जी बिस्किटने 2023-24 या आर्थिक वर्षात चांगला नफा कमावला. हा नफा FY24 मध्ये दुप्पट होऊन 1,606.95 कोटी झाला आहे, जो FY23 मध्ये 743.66 कोटी होता. गेल्या आर्थिक वर्षात पार्ले बिस्कुलचे परिचालन उत्पन्न दोन टक्क्यांनी वाढून 14,349.4, कोटी रुपये झाले आहे. महसुलाबद्दल बोलायचं गेल्यास तो 5.31 टक्क्यांनी वाढून 15,085.76 कोटी रुपये झाला आहे. या आकडेवारीवरून पार्ले बिस्किटाची मागणी अजूनही जोरात असल्याचे दिसून येतं.

कंपनीचा इतिहास

पार्ले कंपनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 1929 मध्ये सुरु झाली. 1990 च्या दशकात चहा आणि पार्ले बिस्किट ही जोडी प्रसिद्ध होती. विले-पार्ले नावावरुन कंपनीला पार्ले नाव देण्यात आलं असंही बोललं जातं. 

पार्लेने 1938 मध्ये पार्ले-ग्लुको या नावाने बिस्किटांचे उत्पादन सुरू केले. स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जीला ग्लुको बिस्किट म्हणून ओळखले जात असे. पण, स्वातंत्र्यानंतर ग्लुको बिस्किटांचे उत्पादन बंद झाले. यामागचे प्रमुख कारण त्यावेळी देशातील अन्न संकट होते, कारण ही बिस्किटे तयार करण्यासाठी गव्हाचा वापर केला जात होता. जेव्हा हे मोठे संकट कमी झाले तेव्हा कंपनीने पुन्हा उत्पादन सुरू केले, परंतु तोपर्यंत या क्षेत्रातील स्पर्धा खूप वाढली होती आणि अनेक कंपन्या बाजारात उतरल्या होत्या. विशेषत: ब्रिटानियाने ग्लुकोज-डी बिस्किटांनी आपली छाप पाडली होती.

Read More