Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आंतर्देशीय क्रूझ टर्मिनल आजपासून प्रवासासाठी सज्ज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतर्देशीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं. 

आंतर्देशीय क्रूझ टर्मिनल आजपासून प्रवासासाठी सज्ज

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतर्देशीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आणि जयकुमार रावल हे देखील उपस्थीत होते. भारतातील पहिल्या मुंबई-गोवा क्रूझ सेवेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. १४ मिनिटात नेरळला आणि ४५ मिनिटात वडखळ नाक्यावर समुद्रातून गाडू घेऊन जाणारी जेट्टी सेवा उभारली जात असल्याची माहिती यावेळी नितीन गडकरींनी दिली.

सिंगल तिकीट सिस्टीम

शिवाय जेएनपीटीतून भिवंडीतील गोडावूनला जाणारी मालवाहतूक बंद करुन बीपीटीमध्येच गोडावून्स बांधण्यात येतील आणि शिपींग सेक्टरसाठी इथेनॉल वापरणं बंधनकारक केलं जाईल असं ते म्हणाले.

बीपीटीमध्ये १ हजार बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल आणि पुढील महिन्यात २ फ्लोटिंग रेस्टॉरंट उभारणार असल्याची माहितीही गडकरींनी दिली.

तर मुंबईत जलवाहतूक, मेट्रो,रेल्वे, बसवाहतूकीसाठी सिंगल तिकीट सिस्टीम आणली जाणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read More