Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

मुंबई : राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आता नाशिकचे पोलीस आयुक्त झाले आहेत. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल आता औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. तर एटीएसचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

विश्वास नांगरे-पाटील 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआधी त्यांनी लातूर, अहमदनगर आणि पुणे ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. पुणे ग्रामीणमध्ये असताना सिंहगडच्या पायथ्याजवळ झालेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांची मुंबईत पोलीस उपायुक्‍त म्हणून बदली झाली होती. त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून त्यांना पदोन्‍नती मिळाली. पोलीस उप महानिरीक्षक म्हणून त्यांनी मुंबई, लाचुलचपत प्रतिबंधक विभागात काम केले. त्यानंतर त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती मिळाली. औरंगाबाद आणि कोल्हापूर परिक्षेत्रात त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले. आता ते नाशिकचे नवे पोलीस आयुक्त झाले आहेत.

Read More