Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मी जेवायला येतो'; आईसोबत शेवटचा संवाद अन्... जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन आत्महत्या

Mumbai Doctor Suicide Case: जे जे हॉस्पिटलमधील डॉक्टरने अटल सेतूवरुन उडी मारली आहे. त्यांचा तपास सुरु झाला आहे. 

 'मी जेवायला येतो'; आईसोबत शेवटचा संवाद अन्... जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन आत्महत्या

 Mumbai J J Hospital Doctor Suicide Case: जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टराने 7 जुलैच्या रात्री 10च्या सुमारास अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. डॉ ओंकार कवितके असे या 32 वर्षीय डॉक्टरचे नाव असून जे जे रुग्णालयात काम करत होते आणि कळंबोली येथे वास्तव्यास होते. 

अटल सेतूवरुन उडी मारण्यापूर्वी 'मी जेवायला येतो' सांगून त्याने अटल सेतूवरुन आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे. 

डॉक्टर ओंकार हे आपल्यावर होंडा अमेझ कारने अटल सेतू वर गेले आणि तेथून त्यांनी समुद्रात उडी घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना गाडी आणि आयफोन मोबाईल सापडला. रेस्क्यू टीमने डॉ ओमकारला समुद्रात शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती अद्याप काही लागले नसून याप्रकरणी काही माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या तरुण डॉक्टराने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार कवितके यांना अटल सेतूवरु खाडीत उडी मारताना एका व्यक्तीने पाहिले. या घटनेची माहिती तात्काळ त्याने पोलिसांना दिली. नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बीट मार्शल लगेच घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर थांबवून ओंकार कवितके यांना खाडीत उडी मारली आहे. पोलिसांना पुलावक डॉक्टरांची अमेझ कार आणि एक आयफोन सापडला आहे. मोबाईलमुळे त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली आहे. अद्याप पोलिसांना डॉक्टरांचा मृतदेह सापडलेला नाही. 

Read More