Dadar Kabutar Khana Jain Protetst: मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आल्याने जैन समाजाने आक्षेप घेतला असून, विरोध दर्शवला आहे. दरम्यान आतापर्यंत शांत पद्धतीन सुरु असलेल्या या विरोधाने आता आक्रमक रुप धारण केलं असून, दादरमध्ये जैन समाजाच्या लोकांनी राडा घातला आहे. जैन समाजाच्या लोकांनी कबूतरखानावर लावण्यात आलेली ताडपत्री फाडून टाकली असून, बांबूला बांधलेल्या सुतळ्याही कापल्या आहेत. लोक आक्रमक झाले असून, पोलीस परिस्थिती शांत कऱण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान अनेकजण पोलिसांशी हुज्जत घालत असून वातावरण तापलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली . मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित दादर येथील कबुतरखाना येथे रोज हजारो कबुतरं खाद्य खाण्यासाठी येतात. मुंबईतील ही एक प्रसिद्ध जागा आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने कारवाई करत कबुतरखाना ताडपत्रीने झाकला होता. कबुतरांना खाद्य घालवण्यार बंदी घालण्यात आल्याने सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले होते. एकीकडे अनेकजण या निर्णयाचं स्वागत करत असताना दुसरीकडे पक्षीप्रेमी आणि जैन समाज याच्या विरोधात होते.
जैन समाज गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखाना येथे एकत्र येत या निर्णयाचा विरोध करत आहे. सरकारने हवं तर आमच्याकडून याचा कर घ्यावा असंही ते म्हणाले होते. त्यांच्या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आजही जैन समाज आंदोलन करणार असल्याची माहिती होती. पण नंतर आंदोलन स्थगित झाल्याची चर्चा सुरु झाली. पण काीह वेळाने लोक एकत्र आले आणि थेट आक्रमक आंदोलन सुरु करत ताडपत्री फाडली आणि आत घुसले. महिला हातात चाकू, धारदार गोष्टी घेत बांबूला बांधलेल्या सुतळ कापू लागल्या. या आंदोलनानंतर परिस्थिती चिघळली आहे.
Dadar mumbai kabutarkhana @ 11.30 pm
— @vip_adani (@vipuladani) August 3, 2025
Plz kabutar ko Dana pani dalne dijiye humble request pic.twitter.com/lHl0GweE4h
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं म्हटलं होतं. तसंच गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची भूमिकाही मांडली होती. "कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. कोणत्या वेळेत फिडिंग व्हावे आणि कोणत्या वेळेत नाही, असा नियम तयार करता येईल. आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा. कबुतराची विष्ठा साफ करण्याचे तंत्र आहे, त्याचाही विचार करा. यासंदर्भात माझी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावे," अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असंही त्यांनी सांगितलं आहे.
FAQ
1) कबूतरखाना का वादग्रस्त आहे?
कबूतरखान्यांमुळे कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार (जसे की हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस), दमा, आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो. यामुळे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या, आणि मुंबई उच्च न्यायालयाने कबूतर खान्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. तसेच, जैन समाजाने याला धार्मिक विश्वासांवर हल्ला मानत विरोध केला आहे.
2) जैन समाजाचा कबूतरखाना बंदीला का विरोध आहे?
जैन समाज कबुतरांना खाद्य देणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे धार्मिक कर्तव्य मानतो. त्यामुळे कबूतर खाना बंदीला त्यांनी धार्मिक विश्वासांवर हल्ला मानलं. ऑगस्ट 2025 मध्ये, जैन समाजाने दादर येथे ‘शांतिदूत यात्रा’ काढून BMC च्या कारवाईविरुद्ध निषेध व्यक्त केला आणि हजारो कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा केला